Home > रिपोर्ट > करोना व्हायरस पासून कसे कराल स्वत:चे संरक्षण, पाहा 6 वर्षाच्या चिमुरडीचा व्हिडीओ...

करोना व्हायरस पासून कसे कराल स्वत:चे संरक्षण, पाहा 6 वर्षाच्या चिमुरडीचा व्हिडीओ...

करोना व्हायरस पासून कसे कराल स्वत:चे संरक्षण, पाहा 6 वर्षाच्या चिमुरडीचा व्हिडीओ...
X

संपूर्ण जगासमोर एक भीषण संकट म्हणून समोर उभा राहिलेल्या करोना व्हायरस चा प्रसार अजुनही काही थांबलेला नाही. दिवसेंदिवस करोनाबाधीत रूग्णाच्या संख्येत वाढ होत असुन बळींची संख्या देखील वाढत चालली आहे. भारतात सुद्धा करोनोचे रूग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याच पार्श्वभुमीवर सरकार देखील करोना व्हायरस च्या लक्षणांविषयी जनजागृती करत आहे. मात्र, तरीही सोशल माध्यमांवरती दररोज नव नवीन अफवा पसरवला जात आहे. त्यामुळं आता सर्वसामान्य नागरीक, लहानांपासून थोरांपर्यंत सगळे आपापल्या परीने कोरोना व्हायरस विषयी जनजागृती करताना दिसत आहे. असाच एक व्हिडीओ समाज माध्यमांवर सध्या व्हायरल झाला आहे. त्यात एक 6 वर्षांची चिमुरडी कोरानाविषयी माहीती देत खबरदारीचे उपाय घेण्यास आवाहन करीत आहे.

शार्वी अमोल वाघ असे त्या 6 वर्षाच्या चिमुकलीचे नाव आहे. या व्हिडिओ मध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, करोना विषयी अफवा पसरवू नये, आपले हात स्वच्छ धुवावे, कुठेही स्पर्श करू नये. या ठिकाणी जाणे टाळावे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या डॉक्टर्स वर विश्वास ठेवावा असे आवाहन ही चिमुरडी या व्हिडीओतून करत आहे.

Updated : 10 March 2020 1:27 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top