Home > रिपोर्ट > 'मुंबई मिरर'मध्ये छापलेली बातमी खोटी

'मुंबई मिरर'मध्ये छापलेली बातमी खोटी

मुंबई मिररमध्ये छापलेली बातमी खोटी
X

तिवसा मतदारसंघातील कॉंग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्याबद्दल छापण्यात आलेली बातमी ही खोटी असल्याचं सांगितले आहे. त्यांनी आपल्या फेसबूक वर लाईव्ह व्हिडीओ करून यांची माहिती दिली आहे.

मुंबई मिररच्या इंग्रजी वर्तमानपत्रात सोनिया गांधी यांना महाराष्ट्रतील कॉंग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत पत्र लिहलं आहे, अशी बातमी मुंबई मिरर या वर्तमानपत्रात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

ही बातमी आमदार यशोमती ठाकुर यांना कळताच त्यांनी फेसबुक लाईव्ह करत म्हटलं की, “वृत्तपत्रात दिलेली माहीती चुकीची आहे, असं कोणतही पत्र आम्ही पाठवलेलं नाही. यासंर्दभात मुंबई मिररच्या मिना बगेल यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी फोन देखील घेतला नाही. बातमी लिहणाऱ्याला मी ओळखत नाही. माझा कोणताही संपर्क या व्यक्तीशी झालेला नाही. त्यामुळे अशा बातम्या छापण्या अगोदर खबरदारी घ्यावी.” असं मत यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलं आहे.

पहा व्हिडीओ...

Updated : 7 Nov 2019 11:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top