Home > रिपोर्ट > घर, नोकरी आणि पक्ष.... महिला कार्यकर्त्यांचं टाईमटेबल कssडक!

घर, नोकरी आणि पक्ष.... महिला कार्यकर्त्यांचं टाईमटेबल कssडक!

घर, नोकरी आणि पक्ष.... महिला कार्यकर्त्यांचं टाईमटेबल कssडक!
X

उन्हाचा पारा जसा चढत आहे, तसा प्रचाराचा ताप वाढत आहे. प्रत्येक पक्षाची महिला कार्यकर्त्यांची फौज सज्ज आहे. प्रत्येकीने कोणतं काम करायचं, कोणती गल्ली, वस्ती पिंजून काढायची, पत्रकं कशी वाटायची, कुठे जमायचं, हे सारं ठरलेलं आहे. अशातच घर- संसार, मुलं, त्यांच्या परीक्षा, नोकरी हे सर्व आहेच. घरची आघाडी सांभाळून महिला कार्यकर्त्यांची तारेवरची कसरत सुरू आहे. २९ एप्रिलपर्यंत असंच चालणार आहे. निवडणुकीच्या काळात महिला नेमकं सारं कसं मॅनेज करतात, घरच्या मंडळींचे कसे सहकार्य मिळते, हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत. ही सारी दगदग सहन करण्यामागची मानसिकता नेमकी काय, हे जाणून घेणेही गरजेचे वाटते.

बहुजन रिपब्लिक सोशॅलिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्या वत्सला हिरे सांगतात,

पहाटे उठून सगळं कामं करून आम्ही बाहेर पडतो. माझा स्वतःचा व्यवसाय आहे. सरकार चांगल येणार असेल तर माझ्या बिझनेसचे नुकसान झालं तरी चालेल. समाजात परिवर्तन घडलं पाहिजे. आज डॉ बाबासाहेब आंबडेकर यांच्यामुळे आमचा समाज उभा आहे. भावी पिढीला चांगलं शिक्षण मिळावं, त्यांना नोकरी मिळावी यासाठी आम्ही महिलांनी रस्त्यावर उतरून काम केले पाहिजे. निवडणूक प्रचार ही एक संधी आहे, मनुवादीची शिक्षणव्यवस्था बदलण्याची.

शिवसेनेच्या कार्यकर्त्या प्रीती पुरव म्हणतात, प्रसारात धावपळ होतेच. पण आपल्या माणसाला निवडून आणण्यासाठी काहीही करणार. घरचे पण मला समजून घेतात. घरच्यांचे पाठबळ नसते, तर काही शक्य नसते.

प्रचाराचा दिनक्रम सांगताना बहुजन वंचित आघाडीच्या छाया शिंदे सांगतात, एका फोनवर महिला जमतो. घरोघरी जातो. आम्ही साऱ्या घरकाम करणाऱ्या बायका आहोत. सकाळी लवकर उठतो. काम पूर्ण करून बाहेर पडतो. काही वेळेला सुट्टी काढावी लागते. उन्हाचा त्रास होतो, दगदग होते, पण पक्षासाठी जीव दृयायला तयार आहेत. वंचितांसाठी कुणी लढणार नाही, आमच्या हक्कासाठी आम्हालाच लढावं लागतंय.

Updated : 11 April 2019 9:57 AM GMT
Next Story
Share it
Top