प्रामाणिक महिला प्रशासकीय अधिकारी नेहा सुरी यांची हत्या
X
पंजाब येथील अन्न व द्रव्य (ड्रग इन्सपिके्टर) विभागातील अधिकारी नेहा सुरी यांच्यावर बलविंदर सिंहने या इसमाने तीन गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.
काय घडल त्या हत्येच्या दिवशी
रोजच्या प्रमाणे कार्यालयात गेलेल्या नेहा सुरीला काय माहिती आजचा हा दिवस तिच्यासाठी अखेरचा ठरणार आहे. तिच्या 4 वर्षीय भाचीला त्याचदिवशी ती आपल्या कार्यालयात घेऊन गेली होती. आणि तिक्यातच अज्ञात इसम येऊन नेहा यांच्यावर बंदूकीने तीन गोळ्या झाडल्या... त्यानंतर नेहाला रुग्णालयात नेऊ पर्यंत तिने अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर आरोपी बलविंदर सिंह याने देखील स्वतःला गोळी मारली आणि त्याचाही मृत्यू
काय आहे प्रकरण?
अधिकारी नेहा सुरी पंजाब च्या मोहाली आणि रोपड जिल्ह्यातील ड्रग्स लाइसेंस संभाळण्याचे काम करत होती. नेहा चंडीगढच्या जवळ खरडमध्ये ड्रग्स रासायनिक प्रयोगशाळेत कार्यरत होती. शुक्रवार (29 मार्चला) मोरिंडा येथे राहणारा आरोपी बलविंदर सिंह नेहाच्या ऑफिस मध्ये घुसला आणि त्याने लाइसेंस बंदुकने नेहावर तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर तो बिल्डिंगच्या खाली पळत पार्किंगच्या दिशेने आला. तिथे त्याने त्याची बाईक उभी केली होती. लैब च्या अटेंडेंट सुरेश कुमार यांनी आरोपीचा पाठलाग करत त्याला पकडलं. त्यानंतर आरोपीने सुरेश वर फायरिंग करायला गेला असता तो खाली पडला आणि त्याने स्वतःला गोळी मारली. त्यात त्याचाही मृत्यू झाला.
पोलिसांच्या चौकशीनुसार आरोपी बलविंदर सिंह मोरिंडा मध्ये औषधांचे दुकान चालवत होता. 2009 मध्ये नेहा ने बलविंदर सिंह याच्या दुकानावर छापा मारला होता. बलविंदरच्या दुकानातून नशेची औषधं जप्त करण्यात आली होते. त्यामुळे नेहा ने त्याच्या दुकानाचे लाइसेंस रद्द केलं होतं या गोष्टीला 10 वर्ष झाले असून कदाचित याचं कारणामुळे नेहाची हत्या झाली आहे.
बलविंदर सिंह याचे मेडिकल लाइसन्स रद्द झाल्यामुळे त्याने रुग्णालय देखील सुरु केलं होतं त्याचेही लाईसन्स नेहाने रद्द केल्यामुळे रुग्णालय बंद पडलं. नेहा यांच्यावर गोळ्या झाडणारा केमिस्ट असुन नेहा सुरी या आपला परवाना रद्द केल्याच्या या रागातुन गोळ्या चालवल्या गेल्याचे कारण समोर येत आहे. नेहा सुरी या अतिशय प्रामाणिक अधिकारी म्हणून प्रसिध्द होत्या. त्यांच्यावरच्या या हल्ल्याने महिला प्रशासकीय अधिका-यांची सुरक्षा हा गंभीर होत चालल्याचे दिसून येत आहे.