आमच्या नेत्यांच्या जीवाला जर धोका असेल तर आम्ही गप्प बसणार नाही - प्रणिती शिंदे
X
चार दिवसाआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीमधील निवासस्थानी असणारी सुरक्षा हटवण्यात आली होती. यामुळे महाविकासआघाडीतील अनेक नेत्यांनी याला विरोध केला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या निर्णयावर आक्षेप नोंदवण्यात आला असून संताप व्यक्त करण्यात आला आहे. यावर अखेर दिल्ली पोलिसांनी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा पूर्ववत करण्यात आली असून पवार यांच्या निवासस्थानाची सुरक्षा हटविण्यात आली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यावर गेले चार दिवस वाद होऊन हा मुद्दा तापल्यानंतर सुरक्षा हटविलीच नाही असं ल्ली पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. यावर काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी म्हटलं ज्यावेळी सोनिया गांधी,प्रियंका गांधी आणि राहूल गांधी यांच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारने तडजोड केली मात्र आता आमच्या नेत्यांच्या जीवाला धोका होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही असा ईशारा प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
https://youtu.be/oNXaW53J_aQ