Home > रिपोर्ट > होम कॉरेंटाईन केलेले कोरोना बाधित घरातून गायब; पोलिसांचा शोध सुरु

होम कॉरेंटाईन केलेले कोरोना बाधित घरातून गायब; पोलिसांचा शोध सुरु

होम कॉरेंटाईन केलेले कोरोना बाधित घरातून गायब; पोलिसांचा शोध सुरु
X

राज्यात कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सध्या 75 रूग्ण कोरोनाबाधित असल्याची माहिती आहे. नागरिकांनी तसंच होम कॉरंटाईनच्या सूचना देणाऱ्या व्यक्तींनी घरीचं राहण्याचं आवाहन सरकारतर्फे करण्यात येतंय. होम कॉरंटाईनच्या सूचना देऊनही ज्या व्यक्ती घरी नाहीत त्यांच्यासाठी पुणे पोलिसांनी एक विशेष मोहीम राबवली आहे. या संदर्भात माय मेडिकल मंत्राने सविस्तर वृत्त दिलं आहे.

पुणे पोलिसांच्या 136 विशेष टीम्स तयार करण्यात आल्या. या टीम्सद्वारे होम कॉरेंटाईनच्या सूचना दिलेल्या व्यक्ती घरात आहेत की नाही हे तपासण्यात आलं.

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक लोकं घरी राहात असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सूचनांचं पालन करत आहेत. पण काही लोकं मात्र, दुसऱ्या ठिकाणी राहात किंवा गावी गेले आहेत. तसंच काही लोकं बेपत्ता असून त्यांच्याशी संपर्क साधता आला नाही.

कॉरंटाईन असून घरी नसलेल्या लोकांना पोलिसांनी जवळच्या पोलीस स्टेशनला त्यांची आणि त्यांच्या आरोग्यासंबंधीची माहिती कळवण्याची विनंती केली आहे. माहिती न कळवल्यास किंवा घरी न परतल्यास त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलं आहे.

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी परदेशातून राज्यात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या हातावर शिक्का मारला जातोय. याचशिवाय त्यांना १४ दिवस होम कॉरंटाईन राहण्याच्या सूचना दिल्या जात आहे. मात्र तरीही अनेक जण घराबाहेर पडल्याच्या अनेक घटना समोर आहेत. जर या व्यक्ती घराबाहेर पडून सार्वजनिक वाहतूकीद्वारे प्रवास करत असतील तर त्यामुळे इतर व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता आहे.

Updated : 23 March 2020 11:15 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top