Home > रिपोर्ट > राज्यात दिशा कायदा लागू होणार? गृहमंत्र्यांचा ताफा आंध्रप्रदेशात दाखल

राज्यात दिशा कायदा लागू होणार? गृहमंत्र्यांचा ताफा आंध्रप्रदेशात दाखल

राज्यात दिशा कायदा लागू होणार? गृहमंत्र्यांचा ताफा आंध्रप्रदेशात दाखल
X

राज्यातील महिला अत्याचारांचं वाढत प्रमाण फारच चिंताजनक आहे. महिलांवरील अत्याचारांना चाप बसावा यासाठी राज्यात कठोर कायदा आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. याच उद्देशातून आंध्र प्रदेश सरकारने केलेल्या 'दिशा' (Disha) कायद्याची माहिती घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ आंध्रप्रदेशमध्ये दाखल दाखल झालं आहे.

महिला अत्याचारांना आळा बसावा म्हणून हैद्राबाद पॅटर्न महाराष्ट्रातही घडून यावा अशी मागणी सामान्य नागरिकांमधून केली जात आहे. महिला अत्याचारांच्या गुन्हयांमध्ये बहुतांश प्रकरणात न्याय मिळण्यासाठी दिरंगाई होत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होतो परिणामी या मागणीला अधिक समर्थन मिळताना पाहायला मिळते.

महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे जलद गतीने चालवून निकाल मिळण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारने केलेला ‘दिशा’ कायदा प्रभावी ठरेल असं म्हटलं जात आहे. त्या अनुषंगाने आंध्रप्रदेशला जाऊन तेथील मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक कार्यालायाला भेटून कायद्याची सविस्तर माहिती घेतली जाणार आहे.

Updated : 20 Feb 2020 10:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top