छेडछाड सहन करु नका, तक्रार करा- यशोमती ठाकूर
X
राज्यासह संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या हिंगणघाट इथल्या जळीतकांड प्रकरणातील आरोपीला गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे असं वक्तव्य महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे. यशोमती ठाकूर यांनी गुरूवारी नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये जाऊन पीडितेची विचारपूस केली.
तसंच तिच्या आई वडिलांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. हिंगणघाट इथली घटना ही विकृती असून त्या नराधमांना शूट केलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनीही नुकतंच नराधमांना मारण्याबाबत वक्तव्य केलं होतं. त्याचं समर्थन यशोमती ठाकूर यांनी केले आहे.
मुलांचा त्रास होतो तर मुलींनी बोललं पाहिजे, त्यांनी आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबद सांगितले पाहिजे असं आवाहनही त्यांनी केले. तर मुलांची मानसिकता बदलण्यासाठी त्यांनादेखील प्रशिक्षण देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.