Home > रिपोर्ट > हिंगणघाट प्रकरण: आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

हिंगणघाट प्रकरण: आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

हिंगणघाट प्रकरण: आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
X

महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या हिंगणघाट जळीतकांड (Hinganghat Teacher Brunt) प्रकरणातील आरोपी विकेश उर्फ विकी नगराळे (Vikesh Nagrale) याने नागपुर कारागृहात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या आरोपीने पांघरुणाच्या चिंधीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा हा प्रयत्न फोल ठरला. यासंदर्भात पोलिस अधिकाऱ्यांनी सदर माहिती खोटी असल्याचं म्हटलं आहे.

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडितेची मृत्यूशी चाललेली झूंज अपयशी ठरली होती. या प्रकरणातील आरोपी विकी नगराळे यास पोलिसांनी ४८ तासाच्या आत अटक करुन जोरबंद केलं होत. परंतु तुरुंगात असताना बुधवारी त्याने पांघरुणाच्या चिंधेने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. इतर आरोपींनी आरडाओरड केल्यावर पोलीस आधिकाऱ्यांनी त्याला लगेच बाहेर काढले आणि त्याच्यावर उपचार करण्यात आले. या आधी ही त्याने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता आपण केलेल्या कृत्याचा त्याला जराही पश्चाताप नाही.

Updated : 21 Feb 2020 6:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top