Home > रिपोर्ट > प्रदूषणाविरोधी तिचा नवा लढा!

प्रदूषणाविरोधी तिचा नवा लढा!

प्रदूषणाविरोधी तिचा नवा लढा!
X

...डीजे चा आवाज कमी कर नाही तर सरिता येईल !

आसपासच्या नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या सततच्या आवाजाचा खूप त्रास होतो.आह अनेक शहरामध्ये आवाजाची मर्यादा देखील पाळण्याचं आवाहन सरकारकडून केलं जातं.मात्र आजही अनेक ठिकाणी अश्या समस्येला अनेकांना सामोरे जावे लागते. मात्र उल्हासनगरमध्ये अशी दहशत आहे की तिथे डीजे किंवा काही कार्यक्रम करण्यासाठी या महिलेची परवानगी घ्यावी लागते.

सत्तरच्या दशकात हिंदीतील सर्वात हिट फिल्म होती 'शोले' याचित्रपटाचे सर्वच संवाद त्याकाळात प्रसिद्ध झाले होते, त्यात एक डायलॉग होता ... यहां से कोसो दूर, जब बच्चा रात को रोता है, तो माँ कहती है बेटा सो जा, सो जा नही तो गब्बर सिंग आ जायेगा. अशीच काही दहशत उल्हासनगर मध्ये सावित्रीच्या लेकीची आहे, जी गेली 5 वर्षापासून ध्वनी प्रदूषणाच्या क्षेत्रात काम करीत असून ध्वनी प्रदूषणात तर तिने बड्या-बड्या लोकांसोबत पंगा घेवून त्याना ठीक केले , या यादीत आमदार, खासदार, मंत्री, पोलिस आयुक्त ते धर्मगुरु सुटलेले नाहीत. उल्हासनगर मध्ये गणपती उत्सव, जयंती मिरवणूक असो की कुठला कार्यक्रम लोकं डीजे लावण्यास घाबरतात. त्या सावित्रीच्या लेकीचे नाव आहे सरिता खानचंदानी. जिने ठाकरे सरकारच्या शपथ विधी नंतर जे फटाके फोडून आतिशबाजी करण्यात आली, ध्वनी प्रदूषण आणि हवेचे प्रदूषण करण्यात आले त्याची तक्रार पोलिसात केली असून कारवाई न झाल्यास न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे.

सरिता खानचंदानी या शिक्षिका असून तिचे पति पुरुषोत्तम खानचंदानी है पेशाने वकील आहेत. तर मुलगी ही चित्रपटातील बाल कलाकार आहे तिने "उतरन" या सीरियलमध्ये त्याचबरोबर तिने राणी मुखर्जी सोबत 'हिचकी' चित्रपटात काम केले आहे. सरिता सांगत आहे आपल्या या प्रदूषणा विरोधीच्या लढयाबद्दल आमचे प्रतिनिधी किरण सोनावणे यांनी घेतलेला हा आढावा.

Updated : 6 Jan 2020 12:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top