जागतिक महिला दिनानिमित्त जिजाऊ संस्थेकडून महाआरोग्य तपासणी शिबिर
X
कोणताही रुग्ण उपचाराविना दगाऊ नये हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मागील १० वर्षांपासून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून निलेश सांबरे विविध आरोग्य विषयक उपक्रम राबवत आहेत. त्याच माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी येथील यशराज हॉस्पिटल मध्ये जिजाऊ संस्था, अटल प्रतिष्ठान, मेडिकल असोसिएशन सावंतवाडी, सिंधुदुर्ग किडनी स्टोन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं.
संपूर्ण कोकण विभागात आरोग्याच्या सुविधा गरजू घटकांना मिळाल्या पाहिजेत. समाजात आरोग्य जनजागृती व्हायला पाहिजे. उपचाराविना कोणताही वंचित राहता कामा नये याचा ध्यास घेऊन जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थाच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष काम करणारे संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे हे गोरगरिबांचे खऱ्या अर्थाने आधारवड असून त्यांच्या या समाजकार्यात आपण सर्वांनी सहभागी ह्यायला पाहिजे अशी भावना अटलचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नकुल पार्सेकर यांनी व्यक्त केली.
[gallery type="thumbnails" ids="10127,10128,10129,10130,10131"]
या आरोग्य शिबीराच्या माध्यमातून सावंतवाडी व तालुक्यातील ५२६ रुग्णांची डोळे तपासणी, हाडांची तपासणी, कॅन्सर तपासणी, डायबेटीस तपासणी, ह्रदयाची तपासणी, ECG तपासणी, स्त्रियांची तपासणी, लहान बालकांची तपासणी, व इतर आजाराची मोफत तपासणी करण्यात आली.
तसेच जिजाऊ संस्थेकडून १३६ रूग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. व सर्व रुग्णांना मोफत औषधे वाटप करण्यात आली. या शिबिराच्या माध्यमातून ७८ रुग्णांचे डोळ्याचे, हृदयाचे, हर्निया तसेच आदी आजाराच्या रुग्णांचे ऑपरेशन करण्यात येणार आहेत. सावंतवाडी येथील महाआरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी अटल प्रतिष्ठान, मेडिकल असोसिएशन सावंतवाडी, सिंधुदुर्ग किडनी स्टोन सेंटर च्या सर्व पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.