Home > रिपोर्ट > महिला धोरण आणणारी काँग्रेस इतिहास विसरली की काय? - प्रतिमा जोशी

महिला धोरण आणणारी काँग्रेस इतिहास विसरली की काय? - प्रतिमा जोशी

महिला धोरण आणणारी काँग्रेस इतिहास विसरली की काय? - प्रतिमा जोशी
X

काँग्रेसने आपल्या उमेदवारींची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत केवळ चार महिला उमेदवार आहेत. यावर “आपलाच इतिहास काँग्रेस विसरली की काय? असा प्रश्न ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी यांनी उपस्थित केला आहे.

"आता 288 पैकी फक्त 51 उमेदवार जाहीर झालेत, त्यामुळं पुढल्या यादीत असू शकतात नावं. पण इथून पुढचं राजकारण काँग्रेस जितक्या लवकर समजून घेईल, तेवढं बरं राहील. काँग्रेस जुन्याच पद्धतीनं निवडणुकांकडे, राजकारणाकडे पाहताना दिसतंय."

"पहिलं महिला धोरण आणणारं राज्य महाराष्ट्र होतं आणि तेही काँग्रेसच्या काळातच. त्यामुळं पहिल्या यादीतील महिला उमेदवारांची संख्या पाहता, आपलाच इतिहास काँग्रेस विसरली की काय, असं चित्र आहे." असं प्रतिमा जोशी म्हणाल्या.

"काँग्रेसकडे मोठी संधी होती. आता त्या पक्षाकडे गमावण्यासारखं काहीच राहिलं नाही. जे संचित होतं, ते संपलेलं आहे. काँग्रेसच्या वैचारिक किंवा इतिहासाबद्दल काही बोलणार नाही, मात्र संसदीय राजकारणात काँग्रेसनं बऱ्याच गोष्टी गमावल्यात." असं देखील त्या म्हणाल्या.

Updated : 1 Oct 2019 3:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top