'मनसे' शर्मिला ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
X
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आदिवासी मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा केला आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला रायगडाच्या आदिवासी पाड्यावर शर्मिला ठाकरे आपल्या मित्र-मैत्रिणींसह पोहचल्या. अन् तिथल्या आदिवासी महिलांना साड्यांचं वाटप आणि मुलांच्या हातून केक कापून त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला.
https://youtu.be/7v2MVzsG0-k
शर्मिला ठाकरे या आपला राजकारणाशी तसा थेट संबंध नसल्याचे वारंवार सांगतात. त्यामुळे राजकीय कार्यक्रमामध्ये सहसा त्या हजेरी लावत नाही. गृहिणी म्हणून त्यांनी राहणं पसंत केललं आहे. तरी सुद्धा राजकीय कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती असावी असं अनेकांना वाटत आहे. आणि त्यांना लोक वेळोवेळी आमंत्रितही करतात. मात्र मी एका चांगल्या वक्त्याची बायको असली तरीही मी स्वतः वक्ता नाही त्यामुळे मी बोलणार नाही असं म्हणून अनेकदा ते भाषण करणं विनम्रपणे टाळतात. पदड्यामागे राहून मनसेला सतत सहकार्य करण्याचे काम ते करत असतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.
https://twitter.com/mnsadhikrut/status/1137228245953212416