Home > रिपोर्ट > मसूद अझहरला भारताच्या ताब्यात द्या - सुषमा स्वराज

मसूद अझहरला भारताच्या ताब्यात द्या - सुषमा स्वराज

मसूद अझहरला भारताच्या ताब्यात द्या - सुषमा स्वराज
X

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करायला चीनने पुन्हा विरोध केला केल्यानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मसूदला भारताच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे."इम्रान खान एक चांगले शासक आहेत असं काही लोक म्हणतात, ते खरंच एवढे उदार असतील तर त्यांनी मसूद अझहरला भारताच्या ताब्यात द्यावं," असं सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे.

मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करायला चीनचा विरोधसंयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) मध्ये दहशतवादी संघटन जैश-ए-मोहम्मद चा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषीत करण्यासाठी मांडलेला प्रस्तावाला चीनने पुन्हा एकदा खोडा घातला आहे. चीनने या प्रस्तावाला आडकाठी आणत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात नकाराधिकाराचा वापर करत मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषीत करण्यास विरोध केला आहे.या अगोदर देखील 4 वेळा भारताने मसूदवर बंदी घालण्याचा प्रस्ताव आणला होता. मात्र, चीनने वीटो पॉवरचा वापर करुन मसूदच्या बंदीला विरोध केल्यानं मसूदवर बंदी घालता आली नाही. मात्र, यावेळी मसूदवर बंदी घालण्यासाठी अमेरिकेसह, फ्रांस, ब्रिटन या देशांनी पुन्हा एकदा प्रस्ताव आणत मसूदवर बंदी घालण्याची मागणी केली होती. मात्र चीनने मसुद विरोधात आणखी पुराव्याची मागणी करत हा प्रस्ताव फेटाळला आहे.

चीनकडून नकाराधिकाराचा चार वेळा वापरचीनने मसूद अझहरसाठी नकाराधिकाराचा वापर केल्याची ही चौथी वेळ आहे. चीन हा सुरक्षा मंडळाचा स्थायी सदस्य असून पाकिस्तानसोबत चीनचे चांगले संबंध आहे. यापूर्वी चीनने अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या प्रस्तावावर २००९, २०१६, २०१७ असा तीनदा नकाराधिकार वापरला होता.जैश-ए-मोहम्मद ही एक दहशतवाद संघटना असून मसूद हा या संघटनेचा प्रमुख आहे. त्यामुळे त्याला दहशतवादी घोषीत केले पाहिजे. मसूदमुळे भारतीय उपमहाद्वीपमध्ये शांततेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो असं मत अमेरिकेनं व्यक्त या संदर्भात व्यक्त केलं आहे.या संदर्भात अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ता रॉबर्ट यांनी चीन सोबत चर्चा झाल्याचे सांगितले होते. भारतीय उपमहाद्वीपमध्ये शांतता राखण्यासाठी मसूदवर बंदी घालणं गरज असल्याची चर्चा रॉंबर्ट यांनी केली होती. मात्र, तरीही चीनने मसूदला पाठीशी घालण्याचे काम केले आहे.भारतात 14 फेब्रुवारीला पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्य़ानंतर 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर आता पुन्हा एकदा मसूदवर बंदी घालण्याची मागणी भारताने केली आहे.या अगोदर देखील 50 वर्षाच्या मसूदने भारतामध्ये अनेक दहशतवादी कारवाया केल्या आहेत. ज्यामध्ये भारतीय संसदेवरील हल्ल्यासह पठानकोट, उरी आणि जम्मू काश्मीरमधील कारवायांचा समावेश आहे.

Updated : 14 March 2019 10:52 AM GMT
Next Story
Share it
Top