Home > रिपोर्ट > पुण्यातले अनोखे हळदीकुंकु

पुण्यातले अनोखे हळदीकुंकु

पुण्यातले अनोखे हळदीकुंकु
X

पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षांची लागवड करणे जेवढे महत्व्याचे असते तेवढंच वृक्षांची जोपासना करणे गरजेचे आहे. वृक्षांची लागवड करण्याचा उद्देशाने शासनाने अनेक संकल्प केले आहेत. पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी जंगल गरजेचे आहे. अलिकडच्या काळात जंगल निर्मिती शक्य नसली तरी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करता येते. असंच कार्यक्रम मकर सक्रंतीच्या औचित्त साधत सुखसागरनगर येथे हळदी कुकूंच्या कार्यक्रमात नेहमी सारख्या भेटवस्तू न देता तनुजा रासकर आणि शीतल रासकर यांनी सुवासिनींना वाण म्हणून तुळशीच्या रोपांसह अनेक प्रकारची रोपे देण्यात आली. त्याचबरोबर या रोपांचे संवर्धन करण्यासाठी या महिलांनी शपथ देखील घेतली. यावेळी माजी नगरसेविका रुपाली पाटील यांनी पुणे शहर आणि उपनगरे झपाट्याने वाढत असल्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हा उपक्रम नियोजित केलेला आहे असं रुपाली पाटील म्हणाल्या. रासकर परिवाराच्या या पर्यावरण संवर्धन कार्यक्रमात ३०० महिलांनी सहभाग घेतला होता. असं तनुजा रासकर यांनी सांगितले. दरम्यान या कार्यक्रमात नगरसेविका राणी भोसले, माजी नगरसेविका रुपाली पाटील, उपसरपंच मनिषा कोपनर, अस्मिता शिंदे सह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

Updated : 18 Jan 2020 7:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top