Home > रिपोर्ट > केंद्रांनी कांदा निर्यात बंदी उठवावी खा.भारती पवार यांची मागणी

केंद्रांनी कांदा निर्यात बंदी उठवावी खा.भारती पवार यांची मागणी

केंद्रांनी कांदा निर्यात बंदी उठवावी खा.भारती पवार यांची मागणी
X

अलिकडेच कांद्याच्या दरात विक्रमी वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या समोर प्रश्न उभा राहिला. भारतात कांद्याची आयात वाढल्यामुळे जागतिक स्तरावरही कांद्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. देशात कांद्यांचे उत्पादन घटल्यामुळे बाजारात तुटवडा निर्माण झाल्याने किंमतीत वाढ झाली आहे. लोकसभेच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याजवळ चर्चा करून ही निर्यात मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

त्याचबरोबर कांद्याच्या देशाच्या एकूण उत्पादनांपैकी महाराष्ट्रात मध्ये जवळ जवळ ३३ टक्के कांद्याचे उत्पादन घेतले जाते,यामध्ये उत्कृष्ट प्रतीच्या कांद्याचे उत्पादन हे नाशिक मध्ये घेतले जाते. परंतु कांद्यावर निर्यात बंदी असल्यानं कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये व तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणारे नुकसान कसे टाळता येईल यासाठी हा मुद्दा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मांडला असून लवकरच कांदा निर्याती बाबत तोडगा काढला जाऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा विश्वास खासदार भारती पवार यांनी व्यक्त केला आहे.

https://youtu.be/z9dOpq1iWhI

Updated : 22 Jan 2020 11:36 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top