आमचे "मत"परत द्या...
X
एकीकडे देशात संविधान दिवस साजरा होत असताना दुसरीकडे मात्र एक युवतीने चक्क विधानसभेला केलेला मतदान रद्द करून मिळण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. पूजा अशोक मोरे असे त्या युवतीचे नाव असून निवडणूक आयुक्त यांच्याकडे ई-मेल व पोस्टाद्वारे विनंती केली आहे. निवडणूक आयोगाच्या आव्हानानुसार "सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा" या आव्हानास सकारात्मक प्रतिसाद देत गेवराई मतदारसंघासाठी बूथ क्रमांक 76 मिरगाव येथे मतदान केले परंतु निकाल लागून एक महिना उलटूनही सत्ता स्थापन होत नाही व खुर्ची साठी अभद्र युत्या व आघाड्या करण्यात सगळे मश्गुल झाले आहेत.सर्वसामान्य मतदार म्हणून माझी फसवणूक केली कारण प्रचारात एकमेकांवर टीका करणारे आज पक्षाच्या विचारधारेला काळिमा फासत आहेत.व सत्तास्थापणेचा असफल प्रयत्न करत आहे म्हणून विधानसभेला केलेलं माझं मत रद्द करून मिळावे व सगळ्या पक्षावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा असे पूजा मोरे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात म्हणले आहे.
https://youtu.be/FX86HUDWcY0