Home > रिपोर्ट > नापास मधला 'ना' काढून टाकला की आयुष्यात नक्की पास होऊ

नापास मधला 'ना' काढून टाकला की आयुष्यात नक्की पास होऊ

नापास मधला ना काढून टाकला की आयुष्यात नक्की पास होऊ
X

मी दहावी नापास आहे, आजवर माझे "दुरावा" "हे गाणे माझ्या मनाचे" "ही माझी इच्छा" "प्रिये" आणि "जय छत्रपती शिवराय" असे एकून पाच कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत.

याशिवाय "माझ्या कविता" म्हणून माझी एक सीडीही बाजार आली आहे. मला मोठे नाही पण छोटे छोटे काही पुरस्कारही मिळाले आहेत. आणि येत्या काही दिवसातच माझे "हाय ती हाय" हे आत्मचरित्र प्रकाशित होईल.

मी जरी दहावी नापास असलो तरी, आणि कॉलेजमध्ये कधीही विद्यार्थी म्हणून गेलो नसलो तरी. आजवर मी बऱ्याच कॉलेजवर कविता वाचनासाठी गेलो आहे. आणि आजवर ज्या ज्या कॉलेजमध्ये कविता सादर केली. तिथल्या तिथल्या विद्यार्थ्यांनी उभे राहून टाळ्या वाजवून माझ्या कवितेला दाद दिली आहे.

मी खुप मोठा साहित्यिक आहे अशातला भाग नाही, पण मराठीतून एम ए केलेल्यांच्या कविता ऐकतो वाचतो तेव्हा आपण यांच्या पुढे तरी नक्कीच आहोत याची जाणीव होते. आज माझे शाळेतले मोठमोठ्या हुद्द्यावर असलेले मित्र मला भेटले की, तुझा अभिमान वाटतो हे आवर्जून म्हणतात. तेव्हा आयुष्यात काहीतरी करून दाखल्याच समाधान वाटतं.. तर सांगायचा मुद्दा हाच की, दहावी नापास झाला म्हणून किंवा थोडीफार मार्क कमी पडली म्हणून खचून जाऊ नका. तुमच्यात वेगळे काही तरी करून दाखवण्याची धमक नक्कीच आहे.

गणेश बर्गे यांनी आपल्या फेसबुक पेजवर ही पोस्ट लिहिली आहे

Updated : 13 Jun 2019 2:52 AM GMT
Next Story
Share it
Top