Home > रिपोर्ट > आगामी मुख्यमंत्री ही महिलाच असावी

आगामी मुख्यमंत्री ही महिलाच असावी

आगामी मुख्यमंत्री ही महिलाच असावी
X

राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर आगामी सरकारची मुख्यमंत्री ही महिलाच असावी अशी मागणी मांडण्यासाठी ‘मिशन महिला मुख्यमंत्री’ अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी मिशन मुख्यमंत्री या अभियानाची भूमिका स्पष्ट केली. येणाऱ्या सरकारचे नेतृत्व महिलेने करावे असा विचार त्यांनी मांडला.

सामाजिक कार्यकर्त्या वर्षा विद्या विलास यांनी पक्षांतर्गत महिला धोरण असावे आणि महिलांची राजकरणात संख्या वाढल्यास सत्तेचे विकेंद्रीकरण आणि राज्यकारभार पारर्दशक होण्यास हातभार लागेल अशी आशा व्यक्त केली. येत्या गुरुवारी, ३ ऑक्टोंबर रोजी दुपारी ३.०० ते ५.०० आझाद मैदान येथे 'गरबा आंदोलन' होणार असून खाली दिलेल्या विषयांवर हे आंदोलन होणार आहे.

1. महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त होणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला असावी

2. प्रत्येक पक्षांतर्गत महिला धोरण तयार करावे.

3. महिला आघाडीला सत्तास्थानी संधी देऊन दैनंदिन निर्णय प्रक्रियेत सहभागी करावे.

4. येत्या विधानसभा निवडणुकीत २०१९ मध्ये जास्तीत जास्त महिलांना उमेदवारी द्यावी.

5. विधानसभा व लोकसभेतील ५०% महिला आरक्षण मंजुरीसाठी विधेयकाचा कसोशीने पाठपुरावा करावा.

Updated : 29 Sep 2019 2:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top