महिलांना बस आणि मेट्रोमध्ये मोफत प्रवास – अरविंद केजरीवाल
Max Woman | 3 Jun 2019 9:25 AM GMT
X
X
दिल्ली परिवहन मंडळाच्या बस, क्लस्टर बसेस आणि मेट्रो ट्रेनमध्ये महिलांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येणार असे दिल्लीचे मुख्यमंत्री आरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले. जेणेकरुन महिला सुरक्षित प्रवास करु शकतील. त्याचप्रमाणे वाढत्या तिकिट दराची चिंता न करता बस किंवा मेट्रोने प्रवास करु शकतात.
ज्या महिलांना तिकीटीच्या किंमती परवडतात, ज्याना तिकीट काढणे शक्य आहे. त्यांनी तिकीट खरेदी करावं. ज्यांना खरच गरज आहे, अशाच महिलांनी याचा संधीचा लाभ घ्यावा.
मेट्रोमध्ये कशाप्रकारे अमंलबजावणी केली जाऊ शकते याची माहिती मिळवण्यासाठी मी सविस्तर अहवाल तयार करण्यास सांगितलं असून अधिकाऱ्यांना एका आठवड्याचा वेळ दिला आहे. दोन ते तीन महिन्यात अमंलबजावणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही लोकांकडूनही सूचना मागवल्या आहेत अशी माहिती केजरीवाल यांनी दिली आहे.
आम्ही केंद्र सरकारकडे तिकीटांचे दर वाढवू नका अशी विनंती केली होती, पण त्यांनी मान्य केली नाही. आमच्यात 50 – 50 टक्के भागीदारी असून वाढीव तिकीट दरांवर 50 -50 टक्के सबसिडी घ्यावी असं सागितलं होतं. पण तेदेखील त्यांनी मान्य केलं नाही.जो काही भार पडेल तो दिल्ली सरकार घेईल. यासाठी आम्हाला मान्यात घेण्याची गरज नाही असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
Updated : 3 Jun 2019 9:25 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire