या कारणामुळे महिला राजकारणात येत नाही - रुपाली पाटील (मनसे) नेत्या
Max Woman | 23 Nov 2019 12:12 PM GMT
X
X
राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचं सरकार येणार असं वाटत असतानाच भाजपनं आज अचानक मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी घडवून आणला. त्यामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. भाजपच्या या राजकारणामुळं धक्का बसलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची संयुक्त बैठक आज मुंबईत झाली. आजची घटना ही धक्का देणारी आहे. असा सूर राजकीय नेत्यांकडून पाहायला मिळाला या सर्व घडामोडींवर (मनसे) महिला नेत्या रुपाली पाटील यांनी मॅक्सवुमन जवळ बोलताना अशी प्रतिक्रिया दिली आहे, आजची घटना धक्का देणारी आहे, हे अतिशय वेगळ्या प्रकारचं राजकारण आहे. नोटबंदी रात्रीची झाली होती, सर्जिकल स्ट्राईक देखील रात्रीची आणि आता हे प्रकरण देखील रात्री झालं आहे. अजित पवारांनी असं का केलं हे समजलं नाही. जे काही घडतंय ते चुकीचं आहे. लोकांनी मतदान केलं आहे त्यांचा अपमान होणे योग्य नाही. या सर्व प्रकरणातून आम्ही काय घेऊ या अश्या घाणेरड्या राजकारणामुळे महिला राजकारणात येत नाहीत , जर राजकारणात माणसात माणूस राहणार नसेल तर या सत्तेचं काय उपयोग असा सवाल (मनसे) नेत्या रुपाली पाटील यांनी उपस्थित केला आहे.
https://youtu.be/A_KKrR_pmr0
Updated : 23 Nov 2019 12:12 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire