Home > बिझनेस > CoronaVirus: इनकम टॅक्स परतावा भरण्यासाठी ३० जूनपर्यंत वाढीव मुदत

CoronaVirus: इनकम टॅक्स परतावा भरण्यासाठी ३० जूनपर्यंत वाढीव मुदत

CoronaVirus: इनकम टॅक्स परतावा भरण्यासाठी ३० जूनपर्यंत वाढीव मुदत
X

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशावर मोठे संकट निर्माण झाले आहे. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्व व्यवसाय ठप्प झाल्याने नागरिकांचं आणि देशाचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. यासाठीच अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पत्रकार परिषदेत महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.

यात इनकम टॅक्स परतावा भरण्याची मुदत आता ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. ज्यांनी २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठीचे रिटर्न फाईल केलेलं नाही त्यांना आता ३० जूनपर्यंत रिटर्न फाइल करता येणार आहेत. तसेच उशीरा रिटर्न फाईल करणाऱ्यांसाठी व्याजर तीन टक्क्यांनी कमी करुन ते ९ टक्के करण्यात आले आहे.

५ कोटींपर्यंत उलाढाल असलेल्या कंपन्यांना जीएसटी रिटर्न भरण्यासाठी उशीर झाल्यास दंड न आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचा जीएसटीचा भरणा ३० जूनपर्यंत करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याचबरोबर आधारकार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची तारीख ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Updated : 24 March 2020 10:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top