Home > रिपोर्ट > फिनलॅंडने दिली जगाला सर्वात तरुण पंतप्रधान

फिनलॅंडने दिली जगाला सर्वात तरुण पंतप्रधान

फिनलॅंडने दिली जगाला सर्वात तरुण पंतप्रधान
X

सना मारिन या जगातील सर्वात तरुण पंतप्रधान म्ह्णून विश्व विक्रम आपल्या नावे रचला आहे. त्या फिनलंडच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान ठरणार आहेत.या आठवड्यात फिनलंड या उत्तर युरोपियन देशाच्या पंतप्रधानपदाची शपथग्रहण करतील. त्या फिनलँडच्या परिवहन मंत्री आणि सोशल डेमोक्रेटिक पार्टीच्या नेत्या आहेत. याआधी देखील त्यांच्याच पक्षाचे म्हणजेच सोशल डेमोक्रेटिक पार्टीचे पंतप्रधान एंटी रिने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला यानंतर सना मारिन यांची निवड या पदासाठी झाली. 2012 मध्ये त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. 2015 मध्ये सना मारिन खासदारपदी निवडून आल्या. वयाच्या २७ वर्षी त्या महापौर झाल्या.

“कमी वयात मी पंतप्रधान या पदापर्यंत जाईन असं मला वाटलं नाही कमी वयात मी सक्रीय राजकारणाला सूरवात केली.”

असं ट्वीट सना मारिन केलं आहे.

युक्रेनचे पंतप्रधान ओलेक्सी होनारुक हे 35 वर्षांचे, तर न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न या 39 वर्षांच्या आहेत. होनारुक हे सर्वात तरुण पंतप्रधान, तर आर्डर्न या सर्वात तरुण महिला पंतप्रधान होत्या. दोघंही पदावर असतानाच, दोघांचाही विक्रम मोडत मरिन या जगातील सर्वात तरुण पंतप्रधान विश्व विक्रम त्यांनी आपल्या नावावर केला आहे.

‘महिलांच्या नेतृत्त्वात सरकार असल्याने फिनलंड हा एक आधुनिक आणि प्रगतीशील देश असल्याचे सिद्ध होते’,

असं फिनलंडचे माजी पंतप्रधान अॅलेक्झँडर स्टब यांनी ट्वीट केलं आहे.

हे ही महत्व्याचे

विशेष म्हणजे फिनलंडमध्ये पाचपैकी चार पक्षांचे प्रमुख महिला आहेत. या चौघीही 34 वर्षांखालील आहेत.

सन्ना मारिन, 34, पंतप्रधान

कतरी कुलमुनी, 32, आर्थिक व्यवहार मंत्री

मारिया ओहिसालो, 34, गृहराज्यमंत्री

ली अँडरसन, 32, शिक्षणमंत्री

अण्णा-माजा हेनरिकसन, 55, न्यायमंत्री

https://twitter.com/TNiskakangas/status/1203729511658995713?s=20

Updated : 10 Dec 2019 6:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top