मी जास्त कांदा खात नाही- निर्मला सीतारमन
Max Woman | 5 Dec 2019 10:07 AM IST
X
X
देशभरात कांद्याच्या किंमतीनं शंभरी गाठली आहे. यावर बुधवारी ससंदेच्या सत्रात चर्चा झाली. कांद्याचे दर हे सरकारसाठीही चिंतेचा विषय ठरत आहेत. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना प्रश्न विचारला असता
“मी जास्त कांदा, लसूण खात नाही त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. मी अशा कुटुंबातून आली आहे, ज्या ठिकाणी कांदा जास्त प्रमाणात खाल्ला जात नाही,”
असं अजब स्पष्टीकरण त्यांनी दिलं. कांदा दरवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने आवश्यक ती पावलं उचचली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
https://youtu.be/tupKf-TA11Q
Updated : 5 Dec 2019 10:07 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire