महिला कार्यकर्त्या संभ्रमात तरीही "त्या" शरद पवारांसोबत
X
आज सकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना येत्या ३० नोव्हेंबर रोजी बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. राज्याच्या विधानसभेत २८८ जागा असून फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १४५ हा जादुई आकडा पूर्ण करावं लागणार आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या ॲड.हेमा पिंपळे यांनी मॅक्सवुमन जवळ बोलताना या राजकारणाचा निषेद केला आहे, त्याचबरोबर
"शरद पवारांच्या ईडी चौकशी नंतर महाराष्टातील जनता जागी दिली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अभूतपूर्व यश दिलं यावरून भाजप जवळ कधीही युती होणार नाही असं स्पष्ट असताना अजित पवारांनी उपमुख्यंत्री पदाची शपथ घेतली यावरून एकच सांगावसं वाटतं आम्ही नेहमी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहू आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाच पुढे जनता साथ देईल"
अशी प्रतिक्रीया ॲड.हेमा पिंपळे यांनी दिली आहे.
https://youtu.be/tTsSeajsTRQ