Home > रिपोर्ट > 'फडणवीसांचा गजनी झालाय'

'फडणवीसांचा गजनी झालाय'

फडणवीसांचा गजनी झालाय
X

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा 'गजनी' झाल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी लगावला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसात विरोधकांनी राज्यातील महिला अत्याचाराविरोधात आक्रमक पवित्र घेतला आहे. त्यांमुळे सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलंय.

विरोधीपक्ष नेते फडणवीस यांनी सरकार महिला अतेयाचारावर चर्चा करायला तयार नाही म्हणून भाजप महिला आमदारांनी जोरदार निदर्शन करत सभागृहाचं दिवसभराचं कामकाज बंद पाडलं. सरकारने महिला अत्याचारावर ठोस निर्णय घावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

यावर रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी "माजी मुख्यमंत्री व गृहमंत्री,सध्याचे विरोधी पक्षनेते कदाचित आपला गजणी झालेला दिसतोय. आपल्याच काळात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात दुसरे, अशी ओळख निर्माण झाली. २०१६ ते २०१८ या काळात ३१,१२६ घटना घडल्या हे आपण विसरू नका.." असं ट्वीट केलं आहे.

Updated : 25 Feb 2020 3:12 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top