Fact Check -अर्धवट माहितीच्या आधारावर स्मृति ईरानींचा प्रियंकावर निशाणा
X
सध्या निवडणुकांच्या धामधुमीत राजकीय पक्ष एकमेंकावर टीका-टिकास्त्र करत आहेत. त्यातच अर्धवट माहितीच्या आधारावर टिक्काटिप्पणी अधिकप्रमाणात वाढताना पाहायला मिळतेय. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ मध्ये प्रियंका गांधी लहान मुलांच्या घोळक्यात आपल्याला पाहायला मिळतेय. या ती लहान मुलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करत आहे. आधी तर त्यांनी चौकीदार चोर है ची घोषणाबाजी केली तर नंतर त्यांनी पंतप्रधानांविरोधात अपशब्दात घोषणाबाजी करु लागले. त्याचवेळी प्रियंका यांनी मुलांना थांबवत हे चांगल नाही वाटतं...चांगले मुलं बना असं म्हटल्यानंतर मुलांनी राहुल गांधी जिंदाबादच्या घोषणा दिल्या. या संपूर्ण व्हिडिओचे 2 भाग करण्यात आले आहे . पहिल्या भागात पंतप्रधानांवर मुलं अपशब्द उच्चारताना प्रियंका गांधी बघत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यावर केंद्रीय मंत्री स्मृति ईरानी यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रियंका यांच्यावर चांगलाच निशाणा साधलाय. त्यांच्या या ट्विटला 8 हजार नेटिझन्सनी रिट्विट करत अनेकांनी प्रियंका यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
https://twitter.com/smritiirani/status/1123288975744090113?s=19
मात्र महिला काँग्रेसने या ट्विटला उत्तर देत संपूर्ण व्हिडिओ जारी करत प्रियंका गांधी यांनी पंतप्रधानांविरोधात अपशब्द काढण्यापासून रोखलं आहे. पाहा हे ट्विट.
https://twitter.com/MahilaCongress/status/1123225328606801920?s=19