फेसबुक बनलंय सॉफ्ट पॉर्न चा अड्डा
X
लॉकडाऊन नंतर जगभरात पॉर्न इंडस्ट्री पुन्हा एकदा तेजीत आली आहे. भारतात ही पॉर्न, सॉफ्ट पॉर्न आणि देसी सेक्स सारख्या सर्चेस नी इंटरनेट वरचं ट्राफिक जाम झालं आहे. अशातच मैत्रीचं आणि संपर्कात राहायचं साधन असलेल्या फेसबुक वर ही पॉर्न आणि सॉफ्ट पॉर्नचा पूर आलाय. विशेषतः देशी ग्राहकांसाठी हिंदी-मराठी तसंच स्थानिय भाषांमधले पॉर्न-सॉफ्ट पॉर्न कंटेट मोठ्या प्रमाणात पुश केलं जात आहे.
भाभी ने किया देवर के साथ ये काम, पती के काम जाते ही भांजे के साथ किया पत्नी ने ये काम, ससूर ने बुझाई बहू की प्यास अशा नावाने मोठ्या प्रमाणावर पॉर्न आणि सॉफ्ट पॉर्न कंटेट फेबुकवर पुश केलं जातंय.
तुमच्या फ्रेंडलिस्ट मध्ये नसलेल्या अकाऊंट वरून तसंच तुमच्या आवडी-निवडीच्या बाहेरचे हे व्हिडीयो अनाहूतपणे लोकांच्या टाइमलाइनवर दिसत आहेत.
फेसबुकच्या ऑल्गोरिदम प्रमाणे तुमच्या आवडीनिवडी प्रमाणे कंटेट पुश केलं जातं, मात्र अचानक काही दिवसांपासून अशा प्रकारचे व्हिडीयो ही वापरकर्त्यांच्या टाइमलाइन वर दिसायला लागले आहेत.
फेसबुक पॉर्न तसंच लहान मुलांवर परिणाम करेल अशा प्रकारचं कंटेट पुश करत असल्याचं डेली मेल ने केलेल्या एका तपासाअंती समोर आलं होतं. २०१७ मध्ये गाजलेल्या या प्रकरणानंतर फेसबुक ने मोठ्या प्रमाणावर कारवाई करत १४ हजार अकाऊंट बंद केले होते.