Home > रिपोर्ट > एक्झिट पोलच्या आकडेवारीमुळे ईव्हीएममध्ये होणार फेरफार – ममता बॅनर्जी

एक्झिट पोलच्या आकडेवारीमुळे ईव्हीएममध्ये होणार फेरफार – ममता बॅनर्जी

एक्झिट पोलच्या आकडेवारीमुळे ईव्हीएममध्ये होणार फेरफार – ममता बॅनर्जी
X

लोकसभा निवडणुकांच्या ७ ही टप्प्यांचे मतदान झालं असून सर्वांचे लक्ष हे एक्झिट पोलकडे लागले होते. मात्र रविवारी ज्या पद्धतीने एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली त्यावरुन पुन्हा एकदा एनडीएचं बाजी मारणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. मात्र या एक्झिट पोलवर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांना केले आहे. दरम्यान, या रणनितीचा उपयोग ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करण्यासाठी केला जातो, असा आरोपही त्यांनी केला आहे.

एक्झिट पोलच्या जाहीर झालेल्या आकडेवारीनंतर ममता बॅनर्जी यांनी ट्विट करून यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मी एक्झिट पोलवर विश्वास ठेवत नाही. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करण्यासाठी ही रणनिती वापरली जाते. मी सर्व विरोधी पक्षांना एकत्र, खंबीर आणि साहसी राहण्याचे आवाहन करत आहे, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले.

https://twitter.com/MamataOfficial/status/1130112216202526720

Updated : 20 May 2019 7:07 AM GMT
Next Story
Share it
Top