Home > रिपोर्ट > #ExclusiveInterview राजकारणात सत्तेसाठी किंवा विशिष्ट पदासाठी आले नाही-श्वेता महाले

#ExclusiveInterview राजकारणात सत्तेसाठी किंवा विशिष्ट पदासाठी आले नाही-श्वेता महाले

#ExclusiveInterview राजकारणात सत्तेसाठी किंवा विशिष्ट पदासाठी आले नाही-श्वेता महाले
X

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघ हा गेली दोन टर्म काँग्रेसच्या ताब्यात होता. गेली अनेक वर्षे भारतीय जनता पार्टी येथून जोर लावून या मतदारसंघावर वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करत होती ,अखेर आपल्या अथक प्रयत्नाने आणि विश्वासाच्या जोरावर श्वेता महाले यांनी या मतदारसंघावर आपला झेंडा फडकला. राज्यातील राजकारणात आता पिढ्यांचे हस्तांतरण होत आहे. तोच कित्ता चिखली मतदारसंघातील जनतेने गिरविला. राजकारणात नव्या दमाच्या लोकांना संधी मिळू लागली आहे.

काँग्रेसचे राहूल बोंद्रे यांनी २००९, २०१४ अशा दोन्हीवेळेला निवडून येत हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला होता. मागच्यावेळी भाजपच्या अप्पा खबुतरे यांचा त्यांनी पराभव केला होता. ही निवडणूक दोन्ही पक्षाच्या उमेदवारांसाठी वर्चस्वाची लढाई होती. भाजपाने या मतदारसंघात श्वेता महालेंना पहिल्यांदा संधी दिली आणि त्यांनी या संधीचे सोने केले.

चिखली हा ग्रामीण मतदारसंघ आहे. ग्रामीण भागातले प्रश्न समजून घेण्यासाठी महाले यांनी जिल्हा परिषदेच्या उंद्री सर्कलचे प्रतिनिधित्व केले. याठिकाणी त्यांनी महिला बालकल्याण सभापतीपदीही त्यांनी काम केले. याकाळात त्यांनी आपल्या सर्कलमधील अनेक विकास कामे करत मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला. मिनी मंत्रालयापासून सुरू केलेला हा त्यांचा प्रवास विधानसभेपर्यत पोहचला.

सुरूवातीपासूनच यावेळी इथल्या निवडणुकीत अनेक चढ-उतार पहायला मिळाले. पहिल्यांदा काँग्रेसचे राहूल बोंद्रे भाजपात जाणार अशी वावडी उठली. नंतर त्यांनी स्वत:हूनच हे नाकारले. हा मतदारसंघ आधी शिवसंग्रामकडे त्यांनतर रयतक्रांतीला दिला असल्याचे सांगितले जात होते. परंतू भाजपने पहिल्यापासूनच याठिकाणी श्वेता महाले यांना उमेदवारी दिल्याचे घोषित केले होते. त्यामुळे या सर्वांवर पडदा पडला.

सासरी आणि माहेरी अशा दोन्ही ठिकाणी राजकीय वारसा असणाऱ्या श्वेता महालेंचे पती विद्याधर महाले हे प्रशासकीय खात्यात उच्चपदी आहेत. त्यांच्या पाठिब्यांनेच त्या सक्रिय राजकारणात उतरल्या.

२०१४ ला त्यांनी विधानसभेवर जाण्यासाठी प्रयत्न केला होता परंतू काही कारणानी ते शक्य झालं नाही. त्यानंतर त्यांनी त्यांचे पितृतुल्य मार्गदर्शक स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर आणि भाजपाचे जळगाव-जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उडी घेतली. उंद्री जिल्हा परिषद सर्कलमधून त्यांनी निवडणूक लढवली. विकास हा एकमेव अजेंडा हाती घेऊन त्यांनी कामाला सुरूवात केली. जनेतेचे अनेक प्रश्न सोडवले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलींचे कन्यादान केले. विविध आंदोलेनात सहभाग घेतला.

यावेळी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत जनता कोणाच्या पारड्यात दान टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच वंचित बहुजन आघाडीने इथे आपला उमेदवार उभा केला असल्याने महाले यांच्या डोकेदुखीत आणखीन वाढ झाली होती. परंतू खरी लढत ही काँग्रेच्या राहूल बोंद्रे यांच्याशीच होती. शेवटी ६ हजार ८१० एवढ्या मतांनी त्या विजयी झाल्या.

युट्युबवर पाहण्यासाठी :

https://youtu.be/TcQsqYDsTkw

फेसबुकवर पाहण्यासाठी

https://youtu.be/0fRAqfBe2eM

-वर्षा कुलकर्णी

Updated : 23 Jan 2020 6:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top