मंत्रिपद स्वीकारल्यानंतर अशोक चव्हाणांचा पहिला कॉल "त्या" पित्याला
X
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रालयातील कामाला सुरवात करून पहिला कॉल आपल्या गाडीची पूजा लेकीला लक्ष्मी मानणाऱ्या ‘त्या’ पित्यालाच केला. दोन वर्षांच्या लेकीच्या पाऊलांनी नव्या गाडीवर उमटवून पूजा करणाऱ्या या पित्याला.कोल्हापूर जिल्ह्यातील राहत असलेले नागेश पाटील यांनी काही दिवसापूर्वी नवीन गाडी घेतली होती. या गाडीची पूजा नागेश पाटील यांनी आपल्या २ वर्षाच्या मुलीच्या पायाच्या ठस्याने केली. हा पूजा करतानाच व्हिडिओ वायरल झाला. टिकटॉकवरील हा व्हिडीओ अशोक चव्हाण यांनी आपल्या फेसबुक पेज आणि ट्विटवर शेअर करता आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मंत्रालयातील कार्यालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून बसण्याचा आज त्यांचा पहिलाच दिवस असून अशोक चव्हाण यांनी पहिला कॉल थेट नागेश पाटील यांनाच लावला.
"मोबाईलवर हा VDO नजरेस पडला. मन भरून आलं. खूप कौतूक वाटलं त्या पित्याचं जो आपल्या नव्या गाडीची पूजा मुलीच्या पदस्पर्शाने करतोय.दोन मुलींचा बाबा असल्याने बाप-लेकीचं नातं काय असतं, त्यातील ओलावा काय असतो, याची मला जाणीव आहे. या बाप-लेकीला भेटायला मला नक्कीच आवडेल!
असं ट्विट अशोक चव्हाण यांनी केलं आहे.
https://twitter.com/AshokChavanINC/status/1214495136450613248?s=20
https://youtu.be/xUEy18SlemA