… नाही कुणी भेटलं, तर तहसीलदार मॅडम हिरोईनच आहेत, भाजप नेत्याचे संतापजनक विधान
Max Woman | 2 Feb 2020 5:20 PM IST
X
X
मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोर्चा काढण्यासाठी हिरोईन आणायची असेल तर हिरोईन आणू आणि नाही कुणी भेटलं, तर तहसीलदार मॅडम हिरोईनच आहेत,” हे संतापजनक वक्तव्य आहे भाजपचे नेते आणि माजी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचं. एकीकडे 'बेटी बचाओ बेटी पढाओ'’चा नारा देत महिलांचा सन्मान करा असं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. आणि त्यांच्याच पक्षाचे नेते अशा प्रकारे महिलांचा अपमान होईल असं वक्तव्य करतात.
दरम्यान ही क्लीप सगळीकडे व्हायरल झाली असून लोणीकर यांच्या वक्तव्याचा महिला संघटनांसह विरोधी पक्षातील नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. दुसरी संतापाची बाब म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी सर्वात मोठा मोर्चा काढण्याचं आवाहन लोणीकर करतात. मात्र, हे आवाहन करताना मोर्चा ला गर्दी होण्यासाठी हिरोईन आणू असं लोणीकर यांनी म्हटलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्न मांडण्यासाठी आता हिरोईन ची गरज पडू लागली आहे का? असा सवाल देखील सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.
काय म्हटलंय लोणीकर यांनी सरकारकडून २५ हजार रूपये अनुदान पाहिजे असेल, तर मराठवाड्यातला सगळ्यात मोठा मोर्चा परतूरला करायचा का तुम्ही ठरवा? सगळ्या सरपंचांनी आपाआपल्या गावातून गाड्या आणल्या पाहिजे. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य सगळ्यांनी ताकद लावली, तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मोर्चा येथे होऊ शकतो.
अधिवेशनाच्या आधी जर मोर्चा झाला, तर २५ हजार लोकं आणेल, ५० हजार लोकं आणेल, तुम्ही सांगा देवेंद्र फडणवीस यांना आणु, तुम्ही सांगा चंद्रकांत पाटलांना आणू. तुम्ही सांगा सुधीर भाऊंना आणू. कुणाला आणायचं तुम्हाला वाटलं तर मग एखादी हिरोईन आणायची तर हिरोईन आणू आणि नाही जर कोणी भेटलं, तर तहसीलदार मॅडम हिरोईनच आहेत. त्या निवेदन घ्यायला येतील,”
असं संतापजनक विधान लोणीकर यांनी केलं आहे.
Updated : 2 Feb 2020 5:20 PM IST
Tags: bjp
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire