Home > रिपोर्ट > आशा भोसलेंनी पाकिस्तानला केलं ट्रोल

आशा भोसलेंनी पाकिस्तानला केलं ट्रोल

आशा भोसलेंनी पाकिस्तानला केलं ट्रोल
X

भारत आणि पाकिस्तान मध्ये 'ट्वीटर वॉर' सुरू असतो मात्र यामध्ये प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी त्यांच्या ट्विटरवर नुकतीच एक पोस्ट टाकली आहे. भाजप सरकारने धाडशी निर्णय घेऊन काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान आणि भारतातील अनेक नेते,सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून ट्वीट करत एकमेकांवर निशाणा साधला. त्यांनी या ट्विटमध्ये कोणताही उल्लेख न करता पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे. त्यांनी लिहिलं, सोनं विसरा, भारतीय सिनेमांच्या सीडींमध्ये गुंतवणूक करा असं ट्विट त्यांनी केलं.

पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपटांवर बंदी असून याशिवाय भारतीय जाहिरातींवरही बंदी घातली आहे. त्यामुळे आशाजींनी पाकिस्तानचा उल्लेख न करता हा ट्विट केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आशाजींचं कौतुक केलं जात आहे.

https://twitter.com/ashabhosle/status/1162281492329857024?s=20

Updated : 16 Aug 2019 6:30 PM IST
Next Story
Share it
Top