Home > रिपोर्ट > इंदिरा गांधींच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या नातवंडांची भावनिक पोस्ट

इंदिरा गांधींच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या नातवंडांची भावनिक पोस्ट

इंदिरा गांधींच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या नातवंडांची भावनिक पोस्ट
X

भारताच्या पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज ३५वी पुण्यतिथी आहे. त्या १९६६ मध्ये देशाच्या पाचव्या पंतप्रधान बनल्या. बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनवण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता.

इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या दोन नातवंडानी सोशल मिडीयावर पोस्ट करून आपल्या आजीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.

"आज माझी आजी इंदिरा गांधी यांचा बलिदान दिवस आहे. त्यांच्या पोलादी, निश्चयी आणि निर्भीड निर्णयांची शिकवण प्रत्येक पावलावर माझं मार्गदर्शन करत राहिल. तुम्हाला शत् शत् नमन," असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

प्रियंका गांधी यांनी आपल्या आजीने शिकवलेला पहिला श्लोक पोस्ट केला आहे. म्हटलं आहे की, “मला आणि माझ्या भावाला आमच्या आजीनं शिकवलेला हा पहिला श्लोक आहे. या श्लोकाची शेवटची ओळ आजही माझ्या मनात गुंजतेय.” अशी भावनिक पोस्ट केली आहे.

Updated : 31 Oct 2019 7:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top