प्रियंका ने दिली पंतप्रधान मोदींना दुर्योधनाची उपमा...
Max Woman | 7 May 2019 11:52 AM GMT
X
X
देशाने अहंकारी व्यक्तींना कधीही माफ केलेले नाही याची साक्ष इतिहास देतो, दुर्योधनाचा अहंकारही असाच गळून पडला होता, अशी दुर्योधनाची उपमा प्रियंका गांधी वढेरा यांनी पंतप्रधान मोदींना दिली . हरयाणातील अंबाला येथे एका प्रचार सभेत त्या बोलत होत्या. देशाचे लक्ष विचलित करण्याचे काम सध्या सुरु आहे.
दरम्यान त्यांनी इतिहासाची साक्ष देताना त्या म्हणाल्या महाभारतात जेव्हा श्रीकृष्ण दुर्योधनाला समजावण्यासाठी गेले होते. तेव्हा दुर्योधनाने त्यांनाच कैद करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी कृष्णाच्या विशाल रुपासमोर दुर्योधनाचा अहंकार नष्ट झाला होता त्याचप्रमाणे हा अहंकार देखील नष्ट होईल . ही निवडणूक मुद्द्यांवर लढत नसून शहिदांच्या नावांनी मत मागितली जातात, अशा शब्दांत प्रियंका गांधी यांनी मोदींवर हल्लाबोल केला.
https://twitter.com/ANI/status/1125694280704638979
Updated : 7 May 2019 11:52 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire