Home > रिपोर्ट > "य़ा" कारणामुळे पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसेंचा पराभव

"य़ा" कारणामुळे पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसेंचा पराभव

य़ा कारणामुळे पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसेंचा पराभव
X

२०१९ च्या विधानसभेत भाजप पक्षातील बंडखोरीमुळेच भाजपाच्या अनेक उमेदवारांना अपयश आलं आहे. रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या समर्थकांचही असचं म्हणणं आहे असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. पक्षामध्ये बंडखोरी करणाऱ्या लोकांची नावं पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवून कारवाई करण्याची मागणी केली असल्याचं खडसे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

दरम्यान त्यांनी परळीमध्ये पंकजांचा पराभवाबद्दल सागंताना पक्षातील लोकांच्या कारस्थानामुळे त्या निवडणूकीमध्ये पडल्या. त्याचबरोबर पंकजांविरोधात उभ्या असणाऱ्या धनंजय मुंडेंना पंकजांचे कार्यकर्ते मदत केल्याचा आरोप पंकजांचे कार्यकर्ते करत आहेत. रोहिणी खडसेंविरोधात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे काम केलं. मी स्वत: अशा अनेक कार्यकर्त्यांना ओळखतो. मी स्वत: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना याबद्दल तक्रार केली आहे,मात्र अजूनही कारवाई झालेली नसून त्यां कारवाई होण्याची वाट पाहत आहे असं खडसे म्हणाले आहेत.

Updated : 3 Dec 2019 9:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top