मातोश्री ते मंत्रालयाच्या मध्ये काय घडलं ?
X
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीवर आधारित 'एक कलासक्त प्रवास : मातोश्री ते मंत्रालय' या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात येऊन राज्यात तीन पक्षाचे सरकार आले. त्याचबरोबर या सरकारचे वेगळेपण म्हणजे ठाकरे घराण्यातील २ मंत्री प्रथम मंत्रालयाच्या दालनात आसनास्थ झाले. या अनुषंगाने विधान परिषदेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या या पुस्तकाचे लेखन आणि संपादन मनोज आवाळे यांनी केले आहे. एकूण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लहानपणापासून ते मंत्री पदापर्यंतचा प्रवास डॉ.मनीषा कायंदे यांनी या पुस्तकात कैद केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः छायाचित्रकार आहेत, त्यामुळे "एक कलासक्त प्रवास मातोश्री ते मंत्रालय" हे पुस्तकाचं नाव ठेवण्यात आल्याचे आमदार डॉ.मनीषा कायंदे यांनी सांगितले.या पुस्तकामध्ये "मातोश्री ते मंत्रालय" हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संघर्षमय प्रवास सामान्य शिवसैनिकांपर्यंत पोहचला पाहिजे, २० वर्षानंतर ही संधी शिवसेनेला मिळाली आहे, मात्र दोघं एकत्रच मंत्री होतील असं नक्कीच वाटलं नव्हतं असं आमदार डॉ.मनीषा कायंदे यांनी मॅक्सवूमनजवळ सवांद साधताना सांगितले.
https://youtu.be/foF1X3WTFB4