Home > रिपोर्ट > पंतप्रधानांनी पुन्हा दिलं टाळ्या आणि मेणबत्त्या पेटवण्याचं आश्वासन - वर्षा गायकवाड

पंतप्रधानांनी पुन्हा दिलं टाळ्या आणि मेणबत्त्या पेटवण्याचं आश्वासन - वर्षा गायकवाड

पंतप्रधानांनी पुन्हा दिलं टाळ्या आणि मेणबत्त्या पेटवण्याचं आश्वासन - वर्षा गायकवाड
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी देशाच्या जनतेला ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता, ९ मिनिटांसाठी मेणबत्ती आणि मोबाईल टॉर्च पेटवून देशाच्या एकतेचं दर्शन घडवण्याचं आवाहन केलं आहे. या संकल्पनेविषयी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी पंतप्रधानांनी कोरोना महामारीशी (CoronaVirus) लढण्याच्या तयारीविषयी न सांगता पुन्हा थाळ्या आणि मेणबत्त्या लावायला सांगितल्या याबद्दल खंत व्यक्त केली आहे.

“देशाच्या नागरिकांनी वैज्ञानिक आणि चिकित्सक दृष्टीकोन बाळगला पाहिजे. मात्र, दुर्दैवाने असं पंतप्रधानांच्या भाषणामधून दिसला नाही. मागल्या भाषणामध्ये टाळ्या आणि आता लाईट बंद करुन मेणबत्ती आणि टॉर्च लावायला सांगितलं आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की, आपल्याला या देशाचं संविधान जे मार्गदर्शन करत, जी आपली कर्तव्य आहेत ती बजावली पाहिजेत.” असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.

“कोरोना महामारीशी लढण्याची आपली तयारी असली पाहिजे. ही साखळी तोडण्यासाठी आपले प्रयत्न असले पाहिजेत. इतर देशांनी जे प्रयत्न केले आहेत त्याचा अभ्यास करुन अंमलबजावणी केली पाहिजे. आज लोकांना रेशनच्या समस्या आहेत. तर कोणी पगार नाही म्हणून राहत्या घराचं भाडं भरु शकत नाही. यावर न बोलता आज पुन्हा देशाच्या पंतप्रधानांनी पुन्हा टाळ्या आणि मेणबत्त्या पेटवा हेच आश्वासन दिलं याची खंत वाटत असल्याची भावना त्य़ांनी व्यक्त केली.

https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/648092082419020/

Updated : 4 April 2020 3:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top