मोदी-शहा ममता बॅनर्जीची बदनामी करतात - मायावती
Max Woman | 16 May 2019 2:38 PM IST
X
X
बंगालमध्ये मोदींच्या दोन सभा असल्यामुळेच निवडणूक आयोगाने गुरुवारी सकाळऐवजी रात्रीपासून प्रचारबंदी केली हा निर्णय अन्यायाकारक असल्याचा समाजवादी पक्षाच्या नेत्या मायावती म्हटल्या. निवडणूक आयोग हे कोणाच्या तरी दबावाखाली काम करतोय असा आरोप देखील मायावती यांनी केला आहे. भाजप सरकार ममता बॅनर्जींना निशाणा बनवत असल्याची टीकाही मायावतींनी केली. मंगळवारी कोलकाता येथे भाजप-तृणमूल काँग्रेसच्या हाणामारीत मोठयाप्रमाणात हिंसाचारही करण्यात आला.
दरम्यान १६मेला रात्री १० वाजल्यापासूनच प्रचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे मोदींच्या प्रचारसभांमुळेच गुरुवारी सकाळपासून प्रचारबंदी लागू करण्याऐवजी रात्रीपासून प्रचारबंदी लागू करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला असल्याची टीका मायावतींनी केली आहे. त्याचबरोबर मोदी - शहा कट कारस्थान करून ममता बॅनर्जीची बदनामी करत आहेत. हे पंतप्रधानपदी बसलेल्या माणसाला अजिबात शोभा देत नाही' असं मायावतींनी मोदींवर टीका केली.
https://twitter.com/ANI/status/1128879145864302592
Updated : 16 May 2019 2:38 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire