Home > रिपोर्ट > राष्ट्रवादी आमदार विद्या चव्हाणांविरोधात सुनेचा छळ केल्याप्रकणी गुन्हा दाखल

राष्ट्रवादी आमदार विद्या चव्हाणांविरोधात सुनेचा छळ केल्याप्रकणी गुन्हा दाखल

राष्ट्रवादी आमदार विद्या चव्हाणांविरोधात सुनेचा छळ केल्याप्रकणी गुन्हा दाखल
X

राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना अधिकाधिक प्रकाशझोतात येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आमदार विद्या चव्हाण यांच्या विरोधात त्यांच्या सुनेने छळ केल्याप्रकरणी विलेपार्ले पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. सुनेने दुसऱ्यांदा मुलीला जन्म दिल्यामुळे चव्हाण कुटुंबीय तीचा छळ करत असल्याचं या तक्रारीत सुनेनं म्हटलं आहे.

विद्या चव्हाण यांठा मोठा मुलगा अजित यांच्या पत्नीने त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात संपुर्ण चव्हाण कुटुंबावर गुन्हा दाखल केलाय. अजित आणि विद्या चव्हाण यांच्या सुनेचं काही वर्षांपुर्वी लग्न झालं असून दोघांना पहिल्यांदा मुलगी झाली. त्यानंतर दुसऱ्यांदा चव्हाण कुटुंबियांकडून मुलासाठी दबाव वाढू लागला. दुसरीही मुलगी झाल्याने चव्हाण कुटुंब पीडितेचा छळ करत होतं. पीडितेला आधीची मुलगी होती. त्यात दुसरीही मुलगीच झाली. मुदतीआधीच प्रसूती होऊन हे बाळ दगावलं. याप्रकारानंतर घरच्यांकडून माझा अधिकच छळ होऊ लागला, असा आरोप पीडितेने केला आहे.

या प्रकरणी पीडितेने 16 जानेवारी रोजी विलेपार्ले पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषद सदस्या विद्या चव्हाण यांच्यासह त्यांचे पती अभिजीत, मुलगा अजित (पीडितेचा नवरा) दुसरा मुलगा आनंद (पीडितेचा दीर) आणि शीतल (आनंद यांची पत्नी) अशा एकूण पाच जणांविरुद्ध पोलिसांनी तक्रार नोंदवली होती.

त्याआधारे पोलिसांनी पाच ही जणांवर भादंवि कलम 498(अ), 354, 323, 504, 506 आणि 36 अन्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान, गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर विद्या चव्हाण व कुटुंबीयांचा जबाब नोंदवून घेण्यात आला असून त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Updated : 3 March 2020 6:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top