Home > रिपोर्ट > रोजच्या ताणतणामुळे महिलांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढतंय?

रोजच्या ताणतणामुळे महिलांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढतंय?

रोजच्या ताणतणामुळे महिलांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढतंय?
X

महिलांना मंदिर प्रवेशाच्या मुद्द्यांवरून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून तृप्ती देसाई परिचित आहेत. महिलांच्या हक्कासाठी त्यांनी अनेक आंदोलनं केली आहेत. भूमाता ब्रिगेडच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी एक पोस्ट आपल्या फेसबूक वर शेअर केली आहे. महिला, मुलींच्यात व्यसनाचं वाढतं प्रमाण ही चिंतेची बाब आहे. तृप्ती देसाई यांनी सदर पोस्टमध्ये रात्री दहा वाजता पुणे येथील बलाजिनगर चौकात घडलेल्या प्रकाराबाबत पोस्ट केली आहे. यामध्ये एक महिला दारू पिऊन रस्त्यावर गोंधळ घालत असल्याचा प्रकार तिथल्या नागरिकांनी तृप्ती देसाई यांच्या निदर्शनास आणून दिले. तृप्ती देसाई यांनी या महिलेशी विचारपूस केली असता या महिलेने पाणीपुरी खाऊन पैसे देण्यास नकार दिल्यामुळे वाद अधिकच वाढत गेला. या महिलेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला गेला मात्र ऐकण्याच्या तयारीत नव्हती, या महिलेचे म्हणणं आहे की तिला येथे मारहाण झालेली आहे. सदर महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिले असता महिलेची तक्रार घेऊन या महिलेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी तृप्ती देसाई यांनी पोलिसांकडे केली.

https://www.facebook.com/trupti.desai.589/posts/2688283937928178

Updated : 4 Jan 2020 2:32 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top