Home > रिपोर्ट > विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती …..

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती …..

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती …..
X

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती …? हा प्रश्न अनेक कार्यकर्ते गेले कित्तेक वर्ष विठ्ठलाला कायम विचारत राहिले.पण एक नेते आहेत...ज्यांनी अत्यंत आगळा वेगळा प्रयोग केला. विठ्ठलाचे उत्तर यायची वाट न पाहता एक एककरून सगळे झेंडे ट्राय केले. एका वर्षात तीन वेगळे झेंडे त्यांनी हातात घेऊन, राजकीय संगीत खुर्चीचा रेकॉर्डमोडला आहे. राजेंद्र गावीत एवढे टॅलेंटड असतील हे कोणाचा गावीच नव्हते. यालाच बाझीगर म्हणतअसावे. नाहीतर कोण एवढ्या पटापट पार्टी बदलण्याची हिम्मत करते.

दिवंगत माजी खा. चिंतामण वनगा यांच्या आकस्मिक निधनामुळे आठ महिन्यापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीतत्यावेळी भाजप व शिवसेना परस्परांच्या समोरासमोर लढले. वनगा यांचे निधन होताच गावित यांनी काँग्रेस मधूनभाजप मध्ये उडी टाकली व काही महिन्यांसाठी का होई ना वनगानंचा जागी खासदार झाले. शिवसेनेने खूपमार्केटिंग करूनही कैलासवासी चिंतामण वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा बाजूलाच राहिले. तसही शिव सेनेलाबाळासाहेब गेल्यापासून स्वतःची हाडतूड करुन घेण्याची सवय आहेच. भाजप वर चिखलफेक करत उद्धवजीठाकरेंनी फडणवीस व गावित यांचीही शाब्दिक हजामत केली. पण त्याने गावीत अजिबात विचलित झाले नाही.उलट त्यांना अजून काही आयडिया आणि झेंडे दिसू लागले. हितेंद्र ठाकूर यांचाही झेंडा हातात घ्यायची इच्छा त्यांना होती. पण बहूजन विकास आघाडीला गावीतांचा टॅलेंट माहीत असल्यामुळे त्यांना भाव मिळाला नाही. याने गावीतना वाईट वाटले पण टॅलेंट लपत नाही आणि झेंडे संपत नाही.

गावित यांच्या सर्व ऊड्या मौका देखके चौका प्रकारचाच असतात बहुतेक. त्यांची लेटेस्ट उडी सुद्धा तेवढीचसॉलिड दिसते. यंदाचा निवडणुकीला पालघरची सीट शिवसेनेची पण त्या ठिकाणी आता गावीत लढणार. कारणगावीत आता शिवसैनिक झाले आहेत. हा “कहानी मे ट्विस्टत ” नसून लॉन्ग जंप चे प्रदर्शन आहे. घरातल्यांनाहीविसरायला होत असेल सध्या गावीत कोणत्या पार्टीत आहेत ते. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः गावीतयांना शिव बंधन बांधले व आधी दिलेल्या शिव्यांचा बंधनातून मुक्त केले . आता गावित करून दाखवतील ! जेशैवसिनिक आयुष्य सेनेला देतात त्यांना प्रत्येक निवडणूक निराश करते. बाळासाहेबांचा प्रेमाखातर लोकं निमूटसहन करतात पण आता ती लोकं संपत अली.

राजकारण म्हणजे आड येईल त्याचा छातीवर पाय देऊन पुढे जाणे. राजकारण म्हणजे अंतर्मनाला झोपेची गोळी देऊन वाट्टेल तसे वागणे. राजकारण म्हणजे पैसे, दारू, आश्वासने आणि बढाई. पालघरच्या मतदारांना हा विनोद वाटतो की अन्याय हे निःश्चित सांगणे कठीण आहे पण निवडणूक या विषयावर प्रत्येक जण मत मांडत आहे हे नक्की. शिवसेना, भाजप, पालघर यांचं काय होईल ते होईल पण राजेंद्र गावीत मात्र कुठेतरी टाकतीलच. एमआयएम कडून राजेन्द्र गवीत निवडणुकीला उभे रहीले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. ते विठ्ठलाला विचारात बसत नाही.

डॉ. स्वप्ना पाटकर

Updated : 31 March 2019 12:44 PM GMT
Next Story
Share it
Top