Home > रिपोर्ट > त्रिगुणी महिला -डॉ शर्वरी इनामदार

त्रिगुणी महिला -डॉ शर्वरी इनामदार

त्रिगुणी महिला -डॉ शर्वरी इनामदार
X

प्रचंड इच्छा शक्ती आणि धाडसी वृत्ती असेल तर वयाची मर्यादा आपल्या कर्तृत्वाच्या आड येत नाही. याचंच उदाहरण म्हणजे वैद्यकीय व्यवसायात नावलौकिक मिळवून पुण्यातील डॉ. शर्वरी इनामदार यांनी पॉवरलिफ्टिंग मध्येही स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

वयाची तिशी ओलांडल्यानंतरही पॉवरलिफ्टिंगकडे वळणाऱ्या शर्वरी यांनी कल्याण येथील गोवली महाविद्यालयाच्या क्रीडांगणात झालेल्या राज्य अजिंक्यपद पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महिलांच्या ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले आहे.

गृहिणी म्हणून कुटुंब सांभाळणं, डॉक्टर म्हणून रुग्णसेवा करणं अशा रोजच्या धावपळीतून वेळ काढून त्यांनी सलग तिसऱ्यांदा ‘बलवान महिला’ (स्ट्राँग वुमन) हा किताब जिंकून सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. यापूर्वी २०१७ आणि २०१८ मध्येही त्यांनी ५२ किलो गटात असा पराक्रम केला होता.

Updated : 17 Oct 2019 9:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top