इंदुरीकरांवर संत तुकाराम महाराजांच्या वंशजांची टीका
X
किर्तनाच्या विनोदी शैलीमुळे प्रसिद्ध असे इंदुरीकर महाराज आपल्या किर्तनांमधून अनेकदा महिलांविषयी वक्तव्य करताना दिसतात. यावेळी सम विषम तारखेच्या वादग्रस्त विधानामुळे इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) चांगलेच अडचणीत सापडले आहेत. यावर आता संत तुकाराम (Sant Tukaram Maharaj) महाराजांचे वंशज सदानंद मोरे (Dr. Sadanand More) यांनी इंदुरीकर महाराजांची किर्तनशैली महाराष्ट्राच्या परंपरेत बसत नाही अशी टीका केली आहे.
“किर्तनातून महिलांना टार्गेट करणे म्हणजे अभिरुची घसरल्याची लक्षणे आहेत, त्यामुळे इंदुरीकराचे किर्तन महाराष्ट्राच्या परंपरेत बसत नाही” असं मत राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांचे वंशज सदानंद मोरे यांनी मांडलं आहे. सम विषम तारखेच्या वादग्रस्त विधानामुळे इंदुरीकरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. यावर त्यांनी ‘मी असं वक्तव्य केलं नाही. असं किर्तन मी केलंच नाही’ असं स्पष्टीकरण दिलं आहे.