Top
Home > रिपोर्ट > ममता बॅनर्जी चक्रीवादळाच्या परिस्थितीही राजकारण करतात - पंतप्रधान नरेंद्र मोदी

ममता बॅनर्जी चक्रीवादळाच्या परिस्थितीही राजकारण करतात - पंतप्रधान नरेंद्र मोदी

ममता बॅनर्जी चक्रीवादळाच्या परिस्थितीही राजकारण करतात - पंतप्रधान नरेंद्र मोदी
X

फानी चक्रीवादळासंदर्भात झालेल्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित नसल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. या आरोपाला प्रत्युत्तर म्हणून ममता बॅनर्जी यांनी आपण नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान मानत नसल्याचे म्हणत त्यामुळेच मी बैठकीला उपस्थित राहिले नाही, असे ममतां यांनी म्हटलं आहे. मला मोदींच्या कोणत्याही बैठकीला जायचे नसून मी थेट देशाच्या नवीन पंतप्रधानांशीच चर्चा करेन.

दरम्यान ममता बॅनर्जी चक्रीवादळाच्या परिस्थितीही राजकारण करत आहे. असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केला होता. केंद्र सरकार बचावासाठी पूर्णपणे सहकार्य करत असून पश्चिम बंगालमधील राजकारणामुळे त्यामध्ये अडथळे येत आहेत. मी स्वतः ममता बॅनर्जी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. मी त्यांच्या फोनची वाट पाहिली. मात्र, त्यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही असं सांगत मोदींनी ममता बॅनर्जी यांना लक्ष केलं.

https://twitter.com/ANI/status/1125418922264682496

https://twitter.com/ANI/status/1125418922264682496

Updated : 7 May 2019 3:43 AM GMT
Next Story
Share it
Top