Home > रिपोर्ट > मायलेकी झाल्या एकाचवेळी डॉक्टरेट

मायलेकी झाल्या एकाचवेळी डॉक्टरेट

मायलेकी झाल्या एकाचवेळी डॉक्टरेट
X

दिल्ली युनिवर्सिटीच्या इतिहासात पहिल्यांदाच आई व मुलगी या दोघींनीही एकाच वेळी डॉक्टरेट पदवी संपादन करण्याची किमया साधली आहे.

आई माला दत्ता (५७) यांनी शिक्षण सोडुन ३४ वर्षांनंतर डॉक्टरेट होण्याचं आपलं स्वप्न पुर्ण केलंय. तर हा आनंद अधिक व्दिगुणीत झाला कारण त्यांची मुलगी श्रेया मिश्रा (२८) हिने ही डॉक्टरेटची पदवी संपादन केलीय.

माला यांनी आपल्या नोकरीतुन आपली लहान मुलगी जी १२ वीत शिकत होती तिच्यासाठी रजा घेतली व त्याबरोबरच डॉक्टरेटसाठी 2012 मध्ये अर्ज केला. तेव्हा पासुन माला यांनी शोधप्रबंधावर कामाला सुरूवातही केली. तर दुसरीकडे त्यांची मुलगी श्रेयानेही पीएचडीसाठी प्रवेश घेतला होती. त्यानंतर माला दत्ता आणि श्रेया या मायलेकींनी एकत्र अभ्यासही केला. एकाचवेळी शोधप्रबंध सादर केले. 2018 मध्ये दोघींच्या मुलाखतीही झाल्या. त्यानंतर दोघींना एकाचवेळी डॉक्टरेट ही पदवी मिळाली. आईकडून खुप काही शिकायला मिळाल्याचं श्रेयानं सांगितंल.

Updated : 27 March 2019 6:22 PM IST
Next Story
Share it
Top