कोकणातल्या पूराकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका! उर्मिला मातोंडकरची मुख्यमंत्र्यांकडे विनंती
Max Woman | 12 Aug 2019 10:57 AM IST
X
X
कोल्हापूर सांगलीप्रमाणेच कोकणातही भीषण पूरपरिस्थिती आहे, नेहमीप्रमाणे कोकणाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका! अशी विनंती अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
सिंधुदुर्गात अनेक गावांचा संपर्क तुटलाय. फळबागा, शेती यांचं अमाप नुकसान होतंय. संपूर्ण कोकणाचाच संपर्क जिकिरीचा झालाय. त्यावर लवकरात लवकर उपाययोजना गरजेची आहे. प्राणहानी टाळायचे सर्व प्रयत्न व्हायला हवे असं उर्मिला यांनी म्हटलंय.
कोकणात जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग कोलमडलाय. कोल्हापूरमार्गे रस्ता पूरामुळे बंदच आहे. यासोबत उत्तर गोव्यातही पूरपरिस्थीती आहे. त्यामुळं संपूर्ण कोकणाचाच बाहेरच्या जगाशी संपर्क तुटायची भीती त्यांनी व्यक्त केलीय.
https://twitter.com/UrmilaMatondkar/status/1160083263253184518?s=20
Updated : 12 Aug 2019 10:57 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire