Home > रिपोर्ट > “नैराश्य एक आजार” दीपिका देतेय नैराश्य दुर करण्याचे धडे

“नैराश्य एक आजार” दीपिका देतेय नैराश्य दुर करण्याचे धडे

“नैराश्य एक आजार” दीपिका देतेय नैराश्य दुर करण्याचे धडे
X

अभिनेता सुशांतच्या मृत्युनंतर कलाकारांतील नैराश्य हा मुद्दा पुढ आला. सुशांतच्या नैराश्यावर अनेकांनी तर्क वितर्क काढले तर काहिंनी शोक व्यक्त केला. मात्र, दीपिका पदूकोण ने याच नैराश्यावर जनजागृती करत आहे. “नैराश्य हा एक आजार”, “नैराश्य हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे”, “नैराश्य हे इतर आजरांप्रमाणेच आहे”, रिपीट आफ्टर मी (Repeat After me) म्हणजेच माझ्या मागून तुम्हीही हे बोला.” असा संदेश देखील तिने आपल्या चाहत्यांना दिला आहे.

दीपिकाने एका मागून एक हिट सिनेमे देत यशाची ही मोठी पायरी गाठली आहे. मात्र तिच्या याच प्रवसामुळं तिला देखील नैराश्यासारख्या स्थितीला तोंड द्यावं लागलं होतं. काही वर्षांपूर्वी दीपिका नैराश्याच्या गर्ततेत अडकली होती व त्यातून बाहेर येण्यासाठी ती मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला देखील घेत होती. एका मुलाखतीत दीपिकाने आपल्याला आलेल्या या नैराश्याबाबत खुलासा केला होता.

या मानसिक आजराविषयी दीपिका खुलेपणाने व्यक्त झाली. कशाप्रकारे तिला तिच्या जवळच्या व्यक्तींनी यातून बाहेर येण्यास मदत केली. तसंच तज्ज्ञांचा सल्लाही तिने कसा घेतला याबाबत तिने भाष्य केलं होतं. त्यावेळी याबाबत मोठी चर्चा रंगली होती. सुशांतच्या आत्महत्येनंतर दीपिका नैराश्याविषयी रोज एक पोस्ट करत जनजगृती करत आहे. यावरून अनेकांनी तिला ट्रोल केलं. पंरतु ट्रोलिंगच्या पलीकडे जाऊन दीपिकाने शेअर केलेले संदेश हे खरंच समजण्याची आणि इतरांनाही समजावण्याची गरज आहे.

Updated : 23 Jun 2020 4:23 AM GMT
Next Story
Share it
Top