Top
Home > रिपोर्ट > भाजपच्या रॅलीत सपना चौधरी

भाजपच्या रॅलीत सपना चौधरी

भाजपच्या रॅलीत सपना चौधरी
X

सुप्रसिद्ध गायिका आणि डान्सर सपना चौधरी भाजपचे दिल्लीचे लोकसभेचे उमेदवार मनोज तिवारी यांच्या रोड शोमध्ये सहभागी झाली. दरम्यान रोड शोमध्ये सपना चौधरीला बघण्यासाठी गर्दी वाढली आणि अखेर पोलिसांना लाठीमार करत गर्दीवर नियंत्रण मिळवावे लागले. लोकसभा निवडणुकीतील तीन टप्प्यांसाठी प्रचार करण्यास राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत.

यामध्ये उत्तर पूर्व दिल्लीतील भाजपाचे उमेदवार मनोज तिवारी यांनी देखील आपल्या प्रचारात सपना चौधरी यांना आणले. याआधी २०१४ मध्ये उत्तर पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. यावेळी मनोज तिवारींसमोर काँग्रेसकडून दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित व आम आदमी पार्टीचे उमेदवार दिलीप पांडे यांचे आव्हान आहे. दिल्लीतील सातही लोकसभेच्या जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे.

Updated : 4 May 2019 1:19 PM GMT
Next Story
Share it
Top