Home > Max Woman Blog > अ‍ॅसिड हल्ला आणि मी पहिल्यांदा पाहिलेला आरसा...

अ‍ॅसिड हल्ला आणि मी पहिल्यांदा पाहिलेला आरसा...

अ‍ॅसिड हल्ला आणि मी पहिल्यांदा पाहिलेला आरसा...
X

अलीकडे 'छपाक' या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. हा चित्रपट अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित असून मुलीवर अॅसिड हल्यानंतर करावा लागणारा संघर्ष आणि तिच्यावर ओढावणारे संकट खूप मोठे असतात याचा दर्शन घडवणारा हा चित्रपट. मात्र तरीही संकटांवर मात करुन ती सुखी आयुष्य जगते. या जगण्याची उमीद अनेकांना प्रेरणा देणारी ठरते. या चित्रपटाची चर्चा झाली तेव्हा लक्ष्मी अग्रवाल हिने म्हंटले होते कि, मी खुश आहे कि, छपाकमध्ये माझी भूमिका दीपिका पादुकोण साकारत आहे. एक प्रसंग एका मुलाखतीदरम्यान तिने सांगितलं आहे.

Image result for lakshmi agarwal

अ‍ॅसिड अटॅक लक्ष्मी अग्रवालची कहाणी:

Image result for lakshmi agarwal

लक्ष्मी दिल्लीमध्ये एका साधारण मध्यम कुटुंबात राहणारी मुलगी. लहानपणीच तिने गायक होण्याचे ठरवलं होतं तेव्हा तिचं वय १५ वर्ष होतं. दिल्लीमध्येच आसपास राहणारा ३२ वर्षीय नदीम खान याला लक्ष्मी जवळ लग्न करायचं होतं मात्र हे लक्ष्मीला मान्य नव्हतं. नदीम नेहमी लक्ष्मीचा पाठलाग करायचा. कित्येकवेळा त्याला नकार देऊनही त्याचा पाठलाग सुरूच होता अखेर २००५ मध्ये लक्ष्मी एका खान मार्केटमध्ये पुस्तकाच्या दुकानाकडे जात होती. आणि त्याच ठिकाणी नदीमने लक्ष्मीच्या चेहऱ्यावर अ‍ॅ-सिड फेकले. अ‍ॅ-सिड चेहऱ्यावर पडल्यामुळे या वेदनेने ती कळवळत होती मात्र कोणी मदतीला न दावता एका टॅक्सी ड्राइवरने तिला सफदरजंग हॉस्पिटलमध्ये नेले. यावेळी उपचारादरम्यान वार्डमध्ये म्हणजे जिथे तिचा उपचार सुरु होता तिथे एकही आरसा लावण्यात आला नव्हता. पाण्यात चेहरा पाहण्याचा प्रयत्न देखील नेहमीच असफल रहायचे. मात्र काही महिन्यानंतर लक्ष्मीने सांगितले की मी माझा चेहरा स्वतः आरशात पाहिला तेव्हा मी अवाक झाले आणि मला माझा आयुष्य उध्वस्त झाल्यासारखं वाटलं. मात्र तिने धीर सोडला नाही आणि हा २००६ ला तिने अ‍ॅसिड बंदीसाठी सर्वाच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तिच्या या लढ्याबाबत तिला त्यावेळी अमेरिकेची माजी पहिली महिला मिशेल ओबामा कडून तिच्या साह्सासाठी इंटरनॅशनल वुमन अ‍ॅवॉर्ड देखील मिळाला होता.

Updated : 13 Jan 2020 6:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top